Expressways of India गेल्या 5 वर्षात आपल्या भारतामध्ये द्रुतगती महामार्गांची भरभराटी झाली आहे, जिथे खूप सार्या एक्सप्रेसवेनचे उद्घाटन झाले आहे आणि काही अजूनही बांधकामाधीन आहेत, तसेच काही एक्सप्रेसवे अर्धवट उघडले गेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये तयार होणारया महामार्गांबद्दल चर्चा करणार आहोत.
1. दिल्ली मुंबई Expressway
तर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, जो भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे देखील आहे. तेराशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे दिल्ली आणि मुंबईला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च एक लाख कोटी रुपये इतका आहे. या आठ लेन एक्स्प्रेसवेचे बारा लेनमध्ये रुंदीकरण करता येणे शक्य होणार आहे. आणि या एक्स्प्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, सोहना ते दौसा या तेराशे पन्नास किलोमीटर पैकी दोनशे शेचाळीस किलोमीटरचे उद्घाटन बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले. जेथे इतर सेकशन्स साठी अधिकृत पूर्णत्वाची तारीख डिसेंबर दोन हजार चोवीस आहे. पण माझ्या अंदाजानुसार ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होऊ शकेल. Expressways of India
2. दिल्ली अमृतसर कटरा Expressway
त्यानंतर दुसरया क्रमांकावर, दिल्ली अमृतसर कटरा हा एक्सप्रेसवे आहे. अंदाजे सहाशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफील्ड एक्सप्रेसवे दिल्ली आणि जम्मूला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च पंचवीस हजार कोटी रुपये इतका आहे. या चार लेन प्रवेश नियंत्रित असलेल्या या एक्स्प्रेसवेचे भविष्यात आठ लेनपर्यंत रुंदीकरण केले जाऊ शकते. या प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे.
3. दिल्ली ते डेहराडून Expressway
तिसरया क्रमांकावर दिल्ली ते डेहराडून एक्सप्रेसवे आहे. अंदाजे हा दोनशे दहा किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड आणि ब्राऊनफील्ड एक्सप्रेसवे आहे. जो दिल्ली ते डेहराडूनला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च तेरा हजार कोटी रुपये इतका आहे. सहा ते बारा लेनचा हा द्रुतगती मार्ग सध्या निर्माणाधीन आहे, आणि तो पूर्ण करण्याची अंतिम तारीख डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे.
4. दिल्ली ते जयपूर Expressway
चौथ्या क्रमांकावर आहे दिल्ली ते जयपूर एक्सप्रेसवे. अंदाजे हा एकशे पंच्याहण्णव किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे आहे, जो दिल्ली ते जयपूरला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च अठरा हजार कोटी रुपये इतका आहे. या द्रुतगती मार्गाच्या सहा लेनचे काम सध्या भूसंपादनाच्या टप्प्यात आहे, आणि तो पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार सत्तावीस आहे.
5. आग्रा ते ग्वाल्हेर Expressway
पाचव्या क्रमांकावर आहे आग्रा ते ग्वाल्हेर एक्सप्रेसवे. अंदाजे हा अठ्ठयांशी पॉईंट चार किलोमीटर लांब सहा लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. जो दोन हजार पाचशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. जो उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर हा प्रकल्प सध्या बोलीच्या टप्प्यात आहे, आणि तो पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार सत्तावीस आहे. Expressways of India
6. अमृतसर ते जामनगर Expressway
सहाव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अमृतसर ते जाम नगर एक्सप्रेसवे. अंदाजे हा एक हजार दोनशे सत्तावन्न किलोमीटर लांबीचा एकूण सहा लेनचा एक्सप्रेसवे आहे, जिथे काही भाग ग्रीनफिल्ड आणि काही भाग ब्राऊनफिल्ड आहे. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च अयांशी हजार कोटी रुपये इतका आहे. जो पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांना एकमेकांशी जोडेल. हा भारतातील दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे असून, या एक्सप्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, या एक्सप्रेसवेचा काही भाग तयार आहे तर काही भाग बांधकामाधीन आहे. दोन हजार पंचवीस पर्यत हा संपूर्ण एक्स्प्रेसवे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अधिकार्यानी ठेवले आहे. Expressways of India
7. गंगा Expressway
सातव्या क्रमांकावर आहे गंगा एक्सप्रेसवे एक्सप्रेसवे. अंदाजे हा पाचशे चौर्यान्नव किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे आहे, हा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील मेरठ ते प्रयागराजला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च चाळीस हजार कोटी रुपये इतका असून हा सहा लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. जो भविष्यात आठ लेन पर्यंत वाढवता येणे शक्य होणार आहे, आणि तो पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार सव्वीस आहे.
8. गोरखपूर लिंक Expressway
आठव्या क्रमांकावर गोरखपूर लिंक एक्सप्रेसवे आहे. अंदाजे चौर्यान्नव किलोमीटर लांबीचा हा ४ लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. जो गोरखपूर ते पूर्वांचल एक्सप्रेसवेला एकमेकांशी जोडतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च पाच हजार नऊशे कोटी रुपये इतका आहे. या प्रकल्पाने आधीच मार्च दोन हजार तेवीसची अंतिम मुदत ओलांडली आहे. दोन हजार चोवीस पर्यंत हा एक्सप्रेसवे पूर्ण होईल अशी आशा आपण करू.
9. नागपूर ते मुंबई Expressway
नवया क्रमांकावर नागपूर ते मुंबई हा एक्सप्रेसवे आहे. अंदाजे सातशे एक किलोमीटर लांबीचा हा सहा लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे, हा एक्स्प्रेसवे पुढे आठ लेनपर्यंत रुंद केला जाऊ शकतो. या द्रुतगती मार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा एक खुला झाला आहे. बाकीचा पुढचा टप्पा दोन भरवीर पर्यंत खुला झाला आहे जो अंदाजे सत्तर किलोमीटर लांबीचा आहे. हा उर्वरित एकशे दहा किलोमीटर लांब, दोन हजार चोवीसच्या अखेरीस उघडण्याची योजना आहे. Expressways of India
10. नागपूर ते गोवा Expressway
दहाव्या क्रमांकावर नागपूर ते गोवा एक्सप्रेसवे आहे. अंदाजे हा सातशे साठ किलोमीटर लांबीचा सहा लेन प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतका असून, जो वर्धाजवळील नागपूर ते मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाईल. आणि असा अंदाज आहे की नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ सात तास असेल, जो सध्या एकवीस तासांचा आहे. या एक्सप्रेसवेच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, हा एक्सप्रेसवे डीपीआरच्या टप्प्यात आहे.
11. संभाजीनगर ते पुणे Expressway
अकराव्या क्रमांकावर औरंगाबाद म्हणजेच संभाजी नगर ते पुणे एक्सप्रेसवे हा आहे. अंदाजे दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा हा सहा लेन प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, तो संभाजी नगर ते पुण्याला अवघ्या दोन तासात एकमेकांशी जोडेल. या प्रवासाला सध्या सुमारे साडेचार तास लागतात. या एक्सप्रेसवेच्या प्रकल्प खर्चातुन दहा हजार कोटींचे भूसंपादन सुरू आहे. Expressways of India
12. सुरत ते चेन्नई Expressway
बाराव्या क्रमांकावर सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवे हा आहे. अंदाजे बाराशे वीस किलोमीटर लांबीचा हा सहा लेन प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. जो प्रकल्पाच्या पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्चातून बांधला जात आहे. जो गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आणि तामिळनाडू अशी चार राज्यांना एकमेकांशी जोडेल. या एक्सप्रेसवेच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर काही विभागांचे बांधकाम सुरू आहे, तर काही भागात भूसंपादन सुरू आहे आणि काही बोलीच्या टप्प्यात आहेत. दोन हजार सव्वीसच्या अखेरीस हा एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. Information adda
13. बेंगळुरू ते चेन्नई Expressway
तेराव्या क्रमांकावर बेंगळुरू ते चेन्नई एक्सप्रेसवे हा आहे. दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीचा हा चार लेन प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. भविष्यात तो आठलेन पर्यत रुंद केला जाऊ शकतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च सतरा हजार कोटी रुपये इतका आहे. जो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या तीन राज्यांना एकमेकांशी जोडेल. या एक्सप्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर काही विभागांचे बांधकाम सुरू आहे आणि काही विभागांचे भूसंपादन प्रगतीपथावर आहे. आणि तो पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे.
14. बेंगळुरू ते पुणे Expressway
चौदाव्या क्रमांकावर बेंगळुरू ते पुणे हा एक्सप्रेसवे येतो. सातशे किलोमीटर लांबीचा हा प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, जो महाराष्ट्रातील पुण्यापासून सुरू होतो आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे संपतो. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च चाळीस हजार कोटी रुपये इतका आहे. हा एक्सप्रेसवे यनयच अट्ठेचाळीसला पर्यायी मार्ग असेल. या एक्सप्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तो डीपीआरच्या टप्प्यात आहे.
15. बेंगळुरू ते विजयवाडा Expressway
पंधराव्या क्रमांकावर बेंगळुरू ते विजयवाडा हा एक्सप्रेसवे आहे. अंदाजे पाचशे अठरा किलोमीटर लांबीचा हा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. या एक्सप्रेसवेला लागणार अंदाजित खर्च एकोनावीस हजार तीनशे वीस कोटी रुपये इतका आहे. यामध्ये तीनशे बत्तीस किलोमीटरचा ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड एक्सप्रेसवे असणार आहे. हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांना एकमेकांशी जोडेल. या एक्सप्रेसवेच्या वर्तमान स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या द्रुतगती मार्गाचे सर्व भाग बांधकामाधीन आहेत. आणि तो पूर्ण करण्याचे लक्ष्य दोन हजार पंचवीस आहे. Expressways of India
तर मित्रांनो अजून बरेच एक्सप्रेसवे आहेत ज्यांचा आम्ही या यादीत अजून समावेश केलेला नाही. तर मित्रांनो यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. आपण परत भेटू एका नवीन video मध्ये, धन्यवाद.