मित्रांनो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका नवीन अपडेट मध्ये आपले स्वागत आहे. जर मी आपल्याला सांगितलेकि हे भारतातील एकमेव विमानतळ असेल ज्यात तुम्ही रस्ता, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्गाने पण येऊ शकता यावर तुमचा विश्वास बसणार नाही. Navi Mumbai International Airport या विमानतळाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे कि मुंबई, पुणे किंवा ठाणे येथून तुम्ही या विमानतळावर सहजपणे पोहोचू शकता. पण ते कसे ? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीबद्दल. नोव्हेंबर 2023 पर्यंत या विमानतळाचे किती काम झाले आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे आपले आजचे आर्टिकल शेवट पर्यंत नक्की वाचा.
या विमानतळाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे कि, कोणत्याही दिशेने तुम्ही या विमानतळावर फक्त 60 ते 90 मिनिटांत पोहोचू शकता. ते कसे हे आधी आपण समजून घेऊ. Navi Mumbai International Airport या विमानतळाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यासाठी चार पर्याय आहेत. जे बाय रोड, बाय ट्रेन, बाय मेट्रो, आणि जलमार्गाने तसेच दुसरा पर्याय असेल तो म्हणजे ये पी यम. म्हणजे ऑटोमेटेड पीपल मूव्हर जे फक्त विमानतळाच्या आत उपलब्ध असेल. तर पहिला पर्याय आहे या विमानतळावर रस्त्याने कसे आपण पोहचू शकता.
या विमानतळावर रस्त्याने आपण कसे पोहचू शकता.
Navi Mumbai International Airport या विमानतळावर दोन प्रवेश बिंदू आहेत, एक पश्चिम बाजू आणि दुसरी पूर्व बाजू, येथे तुम्ही अनेक रस्त्यांवरून येऊ शकता. यासाठी आणखी रस्ते उपलब्ध आहेत आणि काही बांधकामाधीन आहेत, आणि काही रस्ते प्रस्तावित आहेत. यात पहिला रोड आहे तो म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. जर तुम्ही दक्षिण मुंबईचे असाल तर, या पुलावरून तुम्ही नवी मुंबईतील चिर्ले येथे सहज पोहोचू शकता. तेथून NH-348 आणि NH-348A मार्गे तुम्ही या विमानतळाच्या पश्चिमेला पोहोचू शकता. तसेच भविष्यात ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवाजीनगर इंटरचेंजवरून, उलवेच्या उत्तरेकडून कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. याद्वारे पण तुम्ही या विमानतळाच्या पश्चिमेला पोहचू शकाल. आता तुम्ही विचार करत असाल की ही ट्रान्स हार्बर लिंक कधी उघडेल. तर माझा मते या जानेवारीच्या 2 आठवड्यात हा पूल उघडेल.
दुसरा रस्ता आहे सायन पनवेल महामार्ग. जर तुम्ही मध्य मुंबईत राहत असाल तर, या महामार्गावरून तुम्ही विमानतळाच्या पूर्वेकडून प्रवेश करू शकता. तिसरा रस्ता, जर तुम्ही उत्तर मुंबईत रहात असाल तर तुमच्याकडे घोडबंदर रोड आणि ठाणे ते बेलापूर रोड असे दोन पर्याय आहेत, ज्याद्वारे तुम्ही विमानतळाच्या पश्चिमेला पोहचु शकाल. आता तुम्ही विचार करत असाल ते तर खूप लांब आहे, म्हणून आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे अनेक रस्ते प्रकल्प निर्माणाधीन आहेत. जसे कि गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड प्रकल्प होय, भविष्यात तुम्हाला इतका प्रवास करावा लागणार नाही. या लिंक रोड प्रकल्पाद्वारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली असलेल्या बोगद्यातून तुम्ही मुलुंडला पोहोचाल. तेथून ठाणे ते बेलापूर रोडने तुम्ही या विमानतळाच्या पश्चिमेला पोहोचाल. आणि कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्ही संपूर्ण मुंबईतून ट्रान्स हार्बर लिंकद्वारे सहज पोहोचू शकाल.
आता तुम्ही ठाण्यात राहत असाल तर सर्वात सोपा पर्याय आहे, तो म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ठाणे ते बेलापूर रोड जिथून तुम्ही विमानतळाच्या पश्चिमेला पोहोचाल. आणि तुम्ही उल्हास नगर, कल्याण, भिवंडी येथे राहत असाल तर, शिळफाटा आणि NH-48 मार्गे तुम्ही कळंबोली सर्कलला पोहोचाल, तेथून NH-548 मार्गे तुम्ही या विमानतळाच्या पूर्वेला पोहोचाल. आणि जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर मुंबई ते पुणे मार्गे, द्रुतगती मार्गाने तुम्ही या विमानतळाच्या पूर्वेकडे पोहचु शकाल. त्यामुळे या विमानतळाच्या प्रत्येक बाजूला इंटरचेंज असेल, ज्याद्वारे तुम्ही या विमानतळावर सिग्नल फ्री म्हणून प्रवेश करू शकाल. आणि या सर्व रस्त्यांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्याकडे हे 7 रस्ते उपलब्ध आहेत.
या विमानतळावर रेल्वे लाईन्सने आपण कसे पोहचू शकता.
आता आपण रेल्वे लाईन्स कडे येऊ. यात पहिली रेल्वे सीएसएमटी ते पनवेल उपनगरी हार्बर लाईन आहे. दुसरा उरण ते बेलापूर हा रेल्वे मार्ग आहे, आणि तिसरी जेएनपीटी रेल्वे लिंक हि आहे. त्यापैकी सर्वात जवळचा मार्ग उरण ते बेलापूर रेल्वे असेल. कारण या विमानतळाच्या पश्चिमेला जवळच तारघर स्टेशन येते जे पूर्ण झाले आहे. परंतु ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. तसेच जर कोणाला कर्जतच्या बाजूने या विमानतळावर पोहोचायचे असेल तर, तेही सोपे होईल कारण कर्जत ते पनवेल या दुसरया लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर या मार्गावरून लोकल गाड्याही धावतील.
या विमानतळावर मेट्रोने आपण कसे पोहचू शकता.
आता आपण मेट्रोकडे येऊ. या विमानतळावर पोहोचण्यासाठी मेट्रो हे वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे साधन असेल. कारण मेट्रोने तुम्ही थेट टर्मिनलमध्ये प्रवेश करू शकता. कार्यरत मेट्रो मार्गांबद्दल बोलायचे झाले तर फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे नवी मुंबई मेट्रो लाईन एक, बेलापूर ते पेंढार पर्यंत आणि हे नुकतेच उघडण्यात आले आहे. परंतु भविष्यात आणखी मेट्रो मार्ग या विमानतळाला जोडले जातील. यात पहिली आहे मेट्रो लाईन 8, हा एक प्रस्तावित मेट्रो मार्ग आहे जो छत्रपती महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा दुवा असेल.
त्या नंतर येतो बांधकामाधीन असलेली मेट्रो लाइन 2B, ज्याचा विस्तार मानखुर्द ते या विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रो लाईन एक बद्दल बोलायचे झाले तर हे या विमानतळाच्या पूर्वेकडील बाजूस देखील विस्तारित केले जाईल. जे या विमानतळाच्या पूर्वेकडून प्रवेश करेल, आणि नवी मुंबई विभागात नवीन मेट्रो लाईन चार देखील प्रस्तावित आहे. जे या विमानतळाला दिघे, तुर्भे आणि बेलापूरला जोडले जाईल. या सर्व लिंक्सचा विचार करता हे भविष्यात असे काहीतरी दिसेल,
जिथे सोहळा लेनचा रस्ता असेल आणि मध्यभागी मेट्रो लाइन असेल, जवळच्या बेलापूर जेट्टीवरही तुम्ही जलमार्गाने या विमानतळावर पोहोचू शकता, परंतु ते अद्याप प्रस्तावाच्या टप्प्यात आहे. आणि ए पी यम बद्दल बोलायचे झाले तर, जी या विमानतळाच्या आत अंतर्गत वाहतूक व्यवस्था असेल. तुम्हाला दुसरया टर्मिनल किंवा स्थानावर जाण्याची आवश्यकता असल्यास वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ही प्रणाली वापरू शकता. पण ते फक्त Navi Mumbai International Airport विमानतळाच्या आत उपलब्ध असेल. परंतु ते फेज एक मध्ये समाविष्ट केले जाणार नाही, ते टर्मिनल दोन आणि टर्मिनल तीनच्या बांधकामादरम्यान सुरू होईल. या विमानतळाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे कि, तुम्ही कोणत्याही दिशेने येत असाल तर 60 ते 80 किलोमीटरच्या त्रिज्यामध्ये तुम्ही सहज पोहोचू शकता.
Navi Mumbai International Airport या विमानतळाची झालेली प्रगती.
आता आपण जाणून घेऊ या विमानतळाच्या प्रगतीबद्दल. या विमानतळाच्या आजूबाजूला अनेक बांधकामांचा उपक्रम हा चालू आहे. पहिले आपण उलवे टेकडीला पाहू. या टेकडीचे खूप सारे काम हे झालेले आहे. त्यानंतर दक्षिण धावपट्टीचे काम हे अंतिम टप्प्यावर आले आहे. आणि हा डी बी यम स्तर आहे, ज्यानंतर अंतिम स्तर बी सी घातला जाईल. आणि दोन्ही समांतर टॅक्सीवेवर डी बी यम स्तर देखील घातला आहे. आणि यासोबतच रनवे आणि टॅक्सीवेवर रोडलाईट साठी केबल टाकण्याचे काम चालू आहे. आपण पाहू शकता या विमानतळावर अजून काही इमारतींचे काम हे चालू आहे. आता आपण बघू या विमानतळाची मेन टर्मिनल इमारत. सहा महिन्यांपूर्वी हि इमारत अशी दिसत होती,
आणि आता बघितले तर आपल्याला खूप सारे काम हे झालेले पाहायला मिळेल. Navi Mumbai International Airport या विमानतळाची ओपनिंग डेट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस. तेव्हा फक्त फेस एक हा ओपन करण्यात येईल.
तर मित्रांनो यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा video आपल्याला इन्फॉरमेटिव्ह वाटला असेल तर, video ला लाईक करा आणि चॅनल ला नक्की subscribed करा. आपण परत भेटू एका नवीन video मध्ये, धन्यवाद.